पश्चिम बंगालमधील एका पोलीस उपनिरिक्षकाचं पोलीस ठाण्यात डान्स केल्यानं निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस ठाण्यातील त्यांचा डान्स सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला. त्यांवर सगळीकडूनच टिका होऊ लागली. तेव्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत त्यांचं निलंबन करण्यात आलं.कृष्ण सदन मंडल असं या पोलीस उपनिरिक्षकाचं नाव आहे. मंडल हे हिरापूर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते. त्यांची बदली दुसऱ्या पोलीस ठाण्यात करण्यात आली. या बदलीचा आनंद त्यांना इतका झाला की त्यांनी आपल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांसमोर चक्क नाचायला सुरूवात केली. त्यांचा आनंद पाहून इतर कर्मचाऱ्यांनीही त्यांना नाचण्यासाठी प्रोत्साहन दिलं. काहींनी त्यांचा व्हिडिओ ही काढला. पण, मंडल याचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांनीच त्यांच्यावर टिका करायला सुरूवात केली. पश्चिम बंगाल पोलिसांची प्रतिमा मलीन केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला, त्यानंतर तातडीनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews